शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यावर्षी दोनदा द्यावे लागेल संपत्तीचे विवरण नियम बंधनकारक : लोकपाल कायद्याचा परिणाम

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली : लोकपाल कायद्याची अंमलबजावणी पाहता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना यावर्षी आपली संपत्ती आणि त्यावरील कर्जासंबंधी विवरण(प्रॉपर्टी रिटर्न्स) दोनदा सादर करावे लागेल.

नवी दिल्ली : लोकपाल कायद्याची अंमलबजावणी पाहता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना यावर्षी आपली संपत्ती आणि त्यावरील कर्जासंबंधी विवरण(प्रॉपर्टी रिटर्न्स) दोनदा सादर करावे लागेल.
१ ऑगस्ट २०१४ पर्यंत असलेल्या संपत्तीचे पहिले विवरण यावर्षी ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने(डीओपीटी) जारी केला आहे. या कायद्यानुसार यावर्षी ३१ मार्च २०१५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठीचे दुसरे वार्षिक विवरण यावर्षी ३१ जुलैपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील. लोकपाल कायद्यानुसार सादर केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राव्यक्तिरिक्त कर्मचाऱ्यांना सध्या सेवा नियमानुसार स्थावर मालमत्तेसंबंधी विवरण(आयपीआर) द्यावे लागणार आहे. डीओपीटीने सर्व कर्मचाऱ्या आयपीआर देणे बंधनकारक केले आहे.केंद्रीय मुलकी सेवा कायदा १९६४ नुसार सध्याच्या सेवा नियमानुसार ३१ डिसेंबर २०१४ संपणाऱ्या वर्षाचे वार्षिक आयपीआर ३१ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावे लागेल. सर्व कर्मचाऱ्यांनी आयपीआर तसेच लोकपाल कायद्यानुसार विवरण भरावे असे सचिवालयाने सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
----------------
ऑनलाईन सुविधा
आयएएस अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन संपत्तीचे विवरण भरण्याची सुविधा एनआयसीने विकसित केली असून डीओपीटीने त्याबात आदेश जारी केला आहे. ग्रुप ए, बी,सी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नव्या नियमानुसार प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. चालू आर्थिक वर्षात विवरण भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१४ ही होती. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणि आता ३० एप्रिल २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.