शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची लंच डिप्लोमसी; सातव्या फेरीतही ताेडगा निघाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:54 IST

विकास झाडे नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  ...

विकास झाडेनवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  अद्याप कायम आहे. बुधवारी  झालेल्या चर्चेच्या सातव्या फेरीत यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही तर शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर अडून आहेत. ‘एमएसपी’बाबत शेतकऱ्यांना कायदा हवा आहे तर सरकार केवळ लेखी द्यायला तयार आहे. आता पुढील बैठक ४ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या मंत्रिगटाने बुधवारी शेतकऱ्यांबरोबर दुपारचे भोजन घेतले. 

विज्ञान भवनात बुधवारी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दीर्घ चर्चा केली. कायदे तयार करणे आणि रद्द करणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागण्यांसदर्भात एक समिती तयार करण्याची सरकारने तयारी दर्शविली. वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले. दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक  तरतुदी मागे घेण्याबाबतही मंत्र्यानी आश्वासन दिले.

शेतकऱ्यांसोबत  मंत्र्यांचे सहभोजन 

याआधीच्या बैठकांमध्ये सरकारचे जेवण नाकारणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी विज्ञानभवनात मंत्र्यांनी सुखद धक्का दिला. नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांसाठी लंगरमधून आलेल्या जेवणाचा आस्वाद घेतल्याने माहोलच बदलला.  नेहमीप्रमाणे लंगरमध्ये बनलेले जेवण शेतकऱ्यांसाठी विज्ञानभवनात आणण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीच मंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिले.  मंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे निमंत्रण स्वीकारले. सायंकाळी शेतकऱ्यांनीही मंत्र्यांचा सन्मान ठेवत ‘सरकारी’ चहा घेतला. 

विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करावीत

या देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणता येईल. परंतु तसे चित्र नाही. विरोधी पक्ष दमदार नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करण्यासारखी स्थिती असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार