शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन होणारच! गुजरातच्या हद्दीतलं काम तरी वेळेत पूर्ण करा; मोदींच्या सूचना

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 14:57 IST

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देबुलेट ट्रेनच्या कामाच्या संथ गतीबाबत मोदींनी व्यक्त केली नाराजी''केंद्राच्या योजनांना राज्याने सहकार्य केलं नाही म्हणून योजना थांबणार नाहीत''बुलेट ट्रेनचं गुजरातमधील काम तरी पूर्ण करा, मोदींच्या सूचना

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या विरोधानंतरही रद्द केला जाणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतचे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना किंवा प्रकल्पांना राज्य सरकारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसलं म्हणून प्रकल्प थांबविण्यात येणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांसोबतच्या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारसोबतचे वाद सोडवले जात नसतील तर गुजरातच्या हद्दीतील काम तरी वेळेत पूर्ण करा, अशा सूचना मोदींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं समजतं. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामपूर्व कामाच्या संथ गतीवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली.   नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने गुजरातमधील ३४९ किमी पैकी ३२५ किमीवरील कामासाठीच्या कंत्राटासाठीची निवेदनं मागवली आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गुजरातमधील एकूण जमिनीपैकी जवळपास ८५ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झालेले आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण २५ टक्क्यांहून कमी आहे.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईBJPभाजपा