शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

इंधनावरील शुल्कात कपात करून जनतेला दिलासा देणार का?; मोदी सरकारनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:04 IST

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा येणाऱ्या काळात साेसाव्या लागणार आहेत.

नवी दिल्ली : तेल वितरक कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी वाढ केल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर नव्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. ब्रँडेड पेट्राेल आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे दरराेज दरवाढ हाेत आहे. मात्र, केंद्र सरकारची उत्पादन शुल्क कमी करून दरवाढीपासून दिलासा देण्याची मन:स्थिती नाही. केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत हे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या झळा येणाऱ्या काळात साेसाव्या लागणार आहेत.प्रधान यांनी राज्यसभेत प्रश्नाेत्तराच्या तासात विविध प्रश्नांची उत्तरे देताना इंधन दरवाढीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पेट्राेल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, असे म्हणणे चुकीचे असल्याचे प्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले, की गेल्या ३०० दिवसांमध्ये सुमारे ६० दिवस दरवाढ झाली, तसेच पेट्राेलचे दर ७ दिवस आणि डिझेलचे दर २१ दिवस कमी केले आहेत. मात्र, २५० दिवस दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सरकारने उत्पादन शुल्क वाढविले आहे, तर राज्यांनीही उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करात वाढ केली आहे. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणूगाेपाल यांनी इंधन दरवाढीवरून प्रश्न उपस्थित केला हाेता. त्यांच्या गावात पेट्राेलचे दर १०० रुपये प्रतिलिटरपेक्षा जास्त झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पेट्राेलची ३० पैसे आणि डिझेलची २५ पैसे प्रतिलिटर दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्राेलचे दर ९४.१२ रुपये, तर डिझेलचे दर ८४.६३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढले असून, गेल्या वर्षभरात प्रथमच ६१ डाॅलर्स प्रति बॅरलच्या वर दर गेले आहेत. परभणीत सर्वाधिक भावदेशात सर्वांत महाग पेट्राेल राजस्थानच्या गंगानगर येथे आहे. पेट्राेलचे दर ९८.०४ रुपये प्रतिलिटर झाले आहेत, तर ब्रँडेड पेट्राेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. यापूर्वी २७ जानेवारीला ब्रँडेड पेट्राेलचे दर १०० रुपयांवर गेले हाेते.  बुधवारी येथे ब्रँडेड पेट्राेलचे दर १०१.१२ रुपये प्रतिलिटर हाेते. राज्यात परभणीत सध्या सर्वोच्च दर आहे. पेट्रोल तेथे ९६.५८ रुपयांवर आहे.करांबाबत काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?केंद्र आणि राज्य सरकार कर संकलनाबाबत संवेदनशील आहेत. विविध विकासकामांबद्दल प्रत्येक राज्याच्या गरजा आहेत. त्यासाठी वित्त पुरवठा आवश्यक असताे. महसूल मिळविण्यासाठी इंधनावरील कर हा स्रोत असून दिलासा देण्यासाठी शुल्कात कपात हाेणार नसल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.असे आहेत सध्या भाव              पेट्राेल    डिझेलमुंबई       ९४.१२    ८४.६३दिल्ली     ८७.६०    ७७.७३परभणी   ९६.५८    ८५.७२

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल