शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

केंद्राला चपराक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 04:15 IST

राज्यपालांचे सर्व निर्णय रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले. भाजपा सरकारला हा धक्का असल्याचे मानले जात आहे

नवी दिल्ली : राज्यपालांचे सर्व निर्णय रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले. भाजपा सरकारला हा धक्का असल्याचे मानले जात आहे. अरुणाचल सरकारची गच्छंती घडवून आणणारे राज्यपालांचे सर्व निर्णय घटनेचे उल्लंघन करणारे असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. दरम्यान, केंद्र सरकार निकालाची समीक्षा करणार आहे. काँग्रेसचे नीतिधैर्य वाढविणाऱ्या या निर्णयामुळे पक्षाचे बडतर्फ नाबाम तुकी सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांचा १५ डिसेंबर २०१५ चा आदेश रद्द केला. उपाध्यक्षांनी १४ बंडखोर काँग्रेस आमदारांना अपात्र ठरविण्याचा अध्यक्षांचा निर्णय फिरविला होता. ६० सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ४७, भाजपचे ११ व २ अपक्ष आमदार होते. काँग्रेसच्या ४७ आमदारांपैकी १४ जणांना अध्यक्षांनी अपात्र ठरविले. राज्यपालांचे आदेश रद्दन्या.जे.एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने अरुणाचल प्रदेश विधानसभेची १५ डिसेंबर २०१५ पूर्वीची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.मुख्य निकालाचा सारांश वाचताना न्यायमूर्ती खेहर म्हणाले की, राज्यपालांचा ९ डिसेंबर २०१५ चा विधानसभेचे अधिवेशन निर्धारित तारखेच्या आधी (१४ जानेवारी २०१६ ऐवजी १६ डिसेंबर २०१५ रोजी) घेण्याचा आदेश घटनेच्या कलम १६३ आणि १७५ चे उल्लंघन करणारा असल्यामुळे तो रद्द करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्य विधानसभेच्या सहाव्या सत्राच्या कामकाज पद्धतीविषयी राज्यपालांनी दिलेले निर्देशही घटनेचे उल्लंघन करणारे असून, ते रद्द करण्यात येत आहेत.राज्यपालांच्या ९ डिसेंबर २०१५ च्या आदेशान्वये अरुणाचल प्रदेश विधानसभेने घेतलेले सर्व निर्णय कायद्याच्या कसोटीवर उतरत नसून, ते रद्द करण्यात येत आहेत. पार्श्वभूमी : डिसेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशात राजकीय संकट निर्माण झाले होते. काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तुकी सरकार अल्पमतात आले होते. त्याचा फायदा घेत भाजपने तेथेही राष्ट्रपती राजवट लागू करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या ११ आमदारांच्या मदतीने कालोखी पूल मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. मात्र, कोर्टाच्या निकालाने भाजपाची अरुणाचलमधील सत्ता औटघटकेची ठरली.दुसरा दणकासर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रातील भाजप सरकारला बसलेला हा दुसरा मोठा दणका आहे. मार्चमध्ये उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे काही आमदार फुटल्यामुळे हरीश रावत सरकार अल्पमतात आले होते. केंद्रातील सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने रावत यांना सभागृहात बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. यात बंडखोर आमदारांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे रावत सरकार तरले आणि केंद्रातील मोदी सरकार तोंडघशी पडले होते.