शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक, थर्माकोलबंदीच्या सूचना केंद्राने केल्या प्रसिद्ध; २ ऑक्टोबरपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:57 IST

केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. एवढेच नव्हे, ५१ मायक्रॉनवरील पिशव्यांवरही ही बंदी आहे. मात्र, प्लॅस्टिकच्या बाटल्यांना यातून वगळण्यात आले आहे.या संदर्भात सर्व राज्यांसाठी एक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक अशा दोन अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उपक्रम, कंपन्या, खासगी कंपन्या, सर्व सरकारी व खासगी कंपन्या, कार्यालये यांचा त्यात समावेश आहे. सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बंदीमुळे यापुढे कोणत्याही आकाराच्या व जाडीच्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, स्ट्रॉ, सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू वापरता येणार नाहीत.सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याच्या सूचना आहेत.उत्पादनच घेऊ नकाकारखान्यांनीही एकदाच वापरता येणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्या वा वस्तू तयार करू नयेत, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे, तसेच प्लॅस्टिकच्या पुनर्वापराची व नष्ट करण्याची व्यवस्था करावी, असेही म्हटले आहे. या आधी २0१६ सालीही केंद्र सरकारने अशाच सूचना प्लॅस्टिक उद्योगाला दिल्या होत्या.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीCentral Governmentकेंद्र सरकार