शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मणिशंकर अय्यरांच्या मुलीच्या प्रसिद्ध थिंक टँकवर केंद्राची कारवाई; एफसीआरए लायसन रद्द केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 12:25 IST

या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.

केंद्राच्या गृह मंत्रालयानेकाँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या मुलीच्या थिंक टँकवर मोठी कारवाई केली आहे. यामिनी अय्यर यांच्या नेतृत्वाखालील प्रसिद्ध थिंक टँकचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) रद्द केला आहे. 

यामिनी यांच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) असे या थिंक टँकचे नाव आहे. ही संस्था नियमांचे उल्लंघन करत होती, या कारणामुळे तिचे एफसीआरए रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चवर यापूर्वीही आयकर विभागाची नजर पडली होती. आयकर सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये गृह मंत्रालयाने सीपीआरचा एफसीआरए परवाना निलंबित केला होता. आता MHA च्या FCRA विभागाने त्याचा परवाना रद्द केला आहे.

यामिनी यांच्या थिंक टँकला फोर्ड फाऊंडेशनसह अनेक परदेशी संस्थांकडून निधी प्राप्त झाला होता. या थिंक टँकने तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. 2016 मध्येच सेटलवाड यांच्या एनजीओ सबरंग ट्रस्टचा एफसीआरए परवाना निलंबित केला होता. आता सीपीआरवर कारवाई करण्यात आली आहे. 

ही संस्था नेमके काय करते?सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च भारताच्या 21 व्या शतकातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल संशोधन करते. संस्थेच्या वेबसाइटनुसार, भारतातील विचारवंत आणि धोरणकर्ते या संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र येतात आणि धोरणात्मक मुद्द्यांवर निर्णय घेतात. भारताची इको सिस्टीम विकसित करणे हा या बैठकांचा उद्देश असल्याचा संस्थेचा दावा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसHome Ministryगृह मंत्रालय