शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'पद्मावत' नंतर 'अय्यारी' सिनेमा वादात, सेन्सॉरने मंजुरी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:28 IST

करणी सेनेच्या विरोधामुळं पद्मावतच्या  प्रदर्शनामध्ये अडथळे आले होते. त्याचा वाद शांत होतो ना होतो तोच आता अय्यारीचे प्रदर्शन थांबवलं आहे.

नवी दिल्ली - दिग्दर्शक निरज पांडे यांच्या अय्यारी चित्रपटावर संरक्षण मंत्रालयानं आक्षेप घेतल्यामुळं सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं आहे. करणी सेनेच्या विरोधामुळं पद्मावतच्या  प्रदर्शनामध्ये अडथळे आले होते. त्याचा वाद शांत होतो ना होतो तोच आता अय्यारीचे प्रदर्शन थांबवलं आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि अय्यारी एकाच दिवशी रिलीज होणार होते. 

एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी, स्पेशल २६,बेबी यांसारख्या दमदार चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडेचा अय्यारी ९ फेब्रुवारी रोजीच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे. 

तर अक्षय-सिद्धार्थ आमने-सामने‘अय्यारी’हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’ 25 जानेवारीला रिलीज होणार हे ठरले आणि ‘अय्यारी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत 9 फेबु्रवारी ही तारीख निवडली. ही तारीख निवडताना आपल्या चित्रपटासोबत दुसरा कुठलाही मोठा चित्रपट नसणार, ही अपेक्षा नीरज पांडे व टीमला होती. पण झाले भलतेच. ‘पद्मावत’ची रिलीज डेट येताच अक्षय कुमारनेही आपल्या ‘पॅडमॅन’ची रिलीज डेट लांबणीवर टाकत 9 फेबु्रवारी ही तारीख लॉक केली. म्हणजे आता ‘अय्यारी’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा सामना बॉक्सऑफिसवर असणार आहे.