शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: 'बॅटमॅन' आमदाराच्या सुटकेनंतर भाजपा कार्यकर्त्यांचा गोळीबार करुन जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 11:20 IST

तुरुंगातून सुटलेल्या आमदाराचं भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत

भोपाळ: पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. यावेळी विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटनं मारहाण केल्यामुळे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती. मात्र शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयानं 20-20 हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. याची माहिती मिळताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्याच्यासमोर विजयवर्गीय यांचे समर्थक भाजपाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण रस्त्यावर फटाक्यांची माळ पेटवत आहेत. आकाश विजयवर्गीय रविवारी तुरुंगाबाहेर आले. तुरुंगात वेळ चांगला गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी सुटकेनंतर दिली. लोकांसाठी करत असलेलं काम सुरुच राहील, असं विजयवर्गीय यांनी म्हटलं. विजयवर्गीय तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांना हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपण या कृतीचं समर्थन करत असून त्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात येईल, असं विजयवर्गीय म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा