शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधन साजरा करण्याआधीच डोळ्यासमोर बहिणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 13:31 IST

हरियाणामधील सोनेपत जिल्ह्यात भावासमोर बहिणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

चंदिगड, दि. 8 - हरियाणामधील सोनेपत जिल्ह्यात भावासमोर बहिणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मातंड गावात 35 वर्षीय दलित महिलेची पतीने गोळ्या घालून हत्या केली. यावेळी महिलेचा भाऊ तिथेच उपस्थित होता. हा सर्व भयानक प्रकार त्याच्या डोळ्यांसमोर घडला. बहिणीला गोळ्या घातल्याचं पाहताच तो मदतीसाठी धावला, पण तिला वाचवू शकला नाही. वैष्णोदेवी असं या पीडित महिलेचं नाव होतं. त्यांना दोन मुलं आहेत. देशभरात एकीकडे सर्व भाऊ आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं करत असताना, नरेश मात्र आपल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत होता. 

नरेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीने पती धर्मेंदर विरोधात घरगुती हिंसेची तक्रार केली होती. शनिवारीच ही तक्रार करण्यात आली होती. बहिणीवर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करत पती आणि सासरची माणसं वारंवार तिला मारहाण करायची असा आरोप नरेशने केला आहे. 

वैष्णोदेवी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धर्मेंदरला ताब्यात घेतलं होतं. मात्र काही तास चौकशी केल्यानंतर त्याला पत्नीसोबत नीट वागण्याची तंबी देत सोडून देण्यात आलं होतं. 

पोलिसांनी सुटका केल्यानंतर धर्मेंदर घरी परतला. घरी परतताच त्याने रागाच्या भरात पत्नीवर गोळीबार केला. 'मी माझ्या बहिणीला भेटण्यासाठी गेलो होतो. मी तिला रस्त्यावरुन मदतीसाठी धावताना पाहिले. तिच्यामागे धर्मेंदर हातात बंदूक घेऊन पळत होता. त्याचे आई-वडिलही तिला मारुन टाक म्हणून ओरडत होते. त्याने तिला पकडलं, आणि जोपर्यत ती मृत्यूमुखी पडली नाही तोपर्यंत गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार पाहून मीही घाबरलो आणि तिथून पळ काढत मदतीसाठी धावलो', अशी माहिती नरेशने दिली आहे.

जर पोलिसांनी धर्मेंदरविरोधात कडक कारवाई केली असती तर आज माझी बहिण जिवंत असती असं नरेश बोलला आहे. पोलिसांनी धर्मेंदर आणि त्याच्या सहा नातेवाईकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हत्या, तसंच बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.