क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरक्षा दिन साजरा
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
नाशिक : सुरक्षा दिनानिमित्त अंबड येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत औद्योगिक सुरक्षा सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच कंपनीचे व्यवस्थापक मुकुल श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरक्षा दिन साजरा
नाशिक : सुरक्षा दिनानिमित्त अंबड येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत औद्योगिक सुरक्षा सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच कंपनीचे व्यवस्थापक मुकुल श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यात निबंध स्पर्धेत प्रथम रोहित नागमोती, द्वितीय रमेश जगताप, तृतीय एस. आर. वाघचौरे, घोषवाक्य स्पर्धेत प्रथम प्रकाश उबाळे, द्वितीय प्रमोद सदावर्ते, तृतीय सुनीलदत्त शर्मा, तर भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम एस. डी. लाड, द्वितीय प्रमोद पाटील, तृतीय ललित महाले यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सुरक्षा अधिकारी उमेश फुलदेवरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. व्यासपीठावर एस-१ चे व्यवस्थापक विवेक मोरवणे, उमेश बागणीकर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य सुरक्षा अधिकारी सुधीर अवलगावकर यांनी, तर सूत्रसंचालन श्रीराम बनसोडे यांनी केले.