ओझर टाऊनशिप येथे महात्मा फुले जयंती साजरी
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
ओझरटाऊनशिप : येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने व एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्थेच्या सौजन्याने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
ओझर टाऊनशिप येथे महात्मा फुले जयंती साजरी
ओझरटाऊनशिप : येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने व एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. संस्थेच्या सौजन्याने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.एच. ए. एल. चे अतिरिक्त महाव्यवस्थापक आप्पासाहेब मालगौंडनवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या किनो थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिव्हिजनल पी. एफ. कमिशनर जगदीश तांबे सिन्नर महाविद्यालयाचे प्राध्यापक जावेद शेख, कामगार संघटनेचे बी. व्ही. शेळके, अतिरिक्त महाप्रबंधक एस. पी. सिंग, चंद्रकांत गांगुर्डे यांचेसह व्यासपीठावर कामगार संघटनेचे प्रभारी सरचिटणीस अनिल मंडलिक, अधिकारी संघटनेचे एस. कालीमूतू, एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. चे सरचिटणीस लक्ष्मीकांत खैरनार, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कुटे, ग्रामपालिका सदस्य राजू मंडलिक, ओ.बी.सी. संघटना अध्यक्ष भावेश विसपुते, सरचिटणीस राजू माळी, मराठा महासंघ अध्यक्ष संदीप कदम, एक्स सर्व्हिसमन अध्यक्ष आप्पा जाधव, डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती अध्यक्ष मदन जाधव, राहुल कोळपकर आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी पवार, जाधव व शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या विविध संस्थांच्या आलेल्या शुभ संदेशांचे वाचन मुकुंद शेटे यांनी केले. त्यानंतर समितीच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून फुले यांच्या आचार-विचारांचे सर्वांनी आचरण करावे असे आवाहन आप्पासाहेब मालगौंडनवल यांनी अध्यक्षपदावरुन बोलताना केले.यावेळी प्राध्यापक जावेद शेख यांचे व्याख्यान झाले. तसेच अनिल मंडलिक, जगदीश तांबे, नितीन पाटील, शेळके, कालीमूतू, एस. पी. सिंग आदिंची भाषणे झाली.उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार अन्नसेवा समिती नाशिकचे चा यांना त्याचप्रमाणे भगवान हिरे, श्रीमती संध्या भोजने, आशा मानकर, मारुती शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, रांगोळी आदि स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. समाजातील दारिद्र्य रेषेखाली ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये किमतीच्या शालेय वस्तंूचे किट वाटप करण्यात आले.