नवी दिल्ली: प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं. नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी काल रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते. नामवर सिंह यांच्यावर पार्थिवावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या स्मशानघाटात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नामवर सिंह यांनी डझनांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. कविताचे नवीन प्रतिमान(1968), छायावाद(1955), दुसरी परंपरा की खोज(1982) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.
सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 08:59 IST