शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन करा मेट्रोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 14:11 IST

मेट्रो स्थानकांवरही वाढदिवस साजरा करता येणार

हॉटेल, रिसॉर्ट, परदेशात किंवा एखाद्या रम्य ठिकाणी वाढदिवस साजरा करावा, असे अनेकांना वाटते. आपला वाढदिवस अविस्मरणीय व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. अशा लोकांना आता मेट्रोमध्ये वाढदिवस साजरा करता येईल. याशिवाय मेट्रोच्या स्थानकांवरही वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करता येऊ शकेल. जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जेएमआरसी) या संदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे काही दिवसांतच मेट्रोची स्थानके किंवा मेट्रो बुक करुन जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करता येईल.जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो आणि मेट्रो स्थानके भाडे तत्त्वावर देण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र मेट्रो सेवेच्या निर्धारित कालावधीनंतरच अशाप्रकारे मेट्रो रेल्वे आणि तिची स्थानके भाडे तत्त्वावर दिली जातील. जेएमआरसीला सध्या पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे केवळ तिकिटाच्या आधारे मिळणाऱ्या पैशांवर मेट्रो सेवा चालवणे जेएमआरसीला अवघड जात आहे. त्यामुळेच आता मेट्रो आणि स्थानके वाढदिवसांसारख्या समारंभांसाठी भाड्याने देऊन अतिरिक्त कमाई करण्याचा जेएमआरसीचा प्रयत्न आहे. जेएमआरसीकडून तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये चित्रपट आणि जाहिरातींच्या चित्रीकरणाचाही उल्लेख आहे. त्यामुळे चित्रीकरणासाठीही निर्माते मेट्रो किंवा स्थानके भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. या प्रस्तावाला जेएमआरसीच्या सर्व अधिकाऱ्यांनी मान्यतादेखील दिली आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणानुसार दोन तासांसाठी निर्मात्यांना १ लाख रुपये मोजावे लागतील. यामुळे चांदपोल ते मानसरोवर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मेट्रोमध्ये निर्मात्यांना चित्रीकरण करता येईल. जास्तीत जास्त निर्मात्यांनी चित्रीकरण करावे, यासाठी भाडे कमी ठेवण्यात आल्याचे जेएमआरसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. जेएमआरसीला उत्पन्नाचे अधिकाधिक स्रोत मिळावेत, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीदेखील या अधिकाऱ्याने दिली.  

टॅग्स :Metroमेट्रो