शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 08:25 IST

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुरा सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे मोदी सरकारनं रमजानच्या महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली असताना, पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा बांदीपुरामधील हाजिन सेक्टर 13 मध्ये गस्त घालणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या एका पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर सतर्क झालेल्या जवानांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं. मात्र अद्याप जवानांना एकही दहशतवादी सापडलेला नाही. शांतता राखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारनं रमजानच्या महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र रमजानच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. भारतीय सैन्याच्या 15 चौक्या आणि काही वसाहतींना पाकिस्तानी सैन्यानं लक्ष्य केलं. पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचाही मारा केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. याआधी सांबा सेक्टरमध्ये 15 मे रोजी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला होता. सीमेपलीकडून घुसखोरी करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. रविवारपासून पाकिस्तानकडून चारवेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले आहेत. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले आहेत.  

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर