शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या धोरणांना दिशा देणारा 'हा' वरिष्ठ अधिकारी पद सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 16:24 IST

यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही मुदतवाढ घेण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना दिशा देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन हे लवकरच सरकारी सेवेतून मुक्त होणार आहेत. सुब्रमण्यन यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. मात्र, त्यानंतर मुदतवाढ न घेता सुब्रमणियन अमेरिकेला परतरणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. यापूर्वी मोदी सरकारने सुब्रमण्यन यांचा कार्यकाळ वाढवला होता. मात्र, सुब्रमण्यन यांनी वैयक्तिक कारणांमुळे पुन्हा एकदा मुदतवाढ घेण्यास नकार दिला.अर्थमंत्री अरूण जेटली यांनी फेसबुक पोस्टवरून अरविंद सुब्रमणियन यांचे आभार मानले. अरविंद सुब्रमणियन यांनी त्यांच्या कार्यकाळातील चार आर्थिक सर्वेक्षणांच्यावेळी सामान्य जनतेच्यादृष्टीने मांडण्यात येणाऱ्या कल्पना आणि विवेचनाचा दर्जा नव्या उंचीवर नेऊन ठेवला. अनेक समीक्षकांनी त्यांच्या धोरणांचा सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवही केला. चार दिवसांपूर्वीच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मी अरविंद सुब्रमणियन यांना भेटलो. त्यावेळी सुब्रमणियन यांनी आपल्याला आता कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, असे मला सांगितले. त्यासाठी अमेरिकेत परतण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. त्यांची ही कारणे भले वैयक्तिक असतील पण त्यांच्यादृष्टीने खूपच महत्त्वाची आहेत. माझ्यासमोर सुब्रमणियन यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे जेटली यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाPoliticsराजकारण