शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएं’ना ईडीची भीती? याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची भूमिका मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:05 IST

सीएंचे पोलिसीकरण, वकिलाचा युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट - सीए), कंपनी सचिव आणि खर्च लेखापाल (कॉस्ट अकाउंटंट) यांना अहवाल देणारी संस्था (रिपोर्टिंग इन्स्टिट्यूट) म्हणून समाविष्ट करण्याच्या तरतुदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्लीउच्च न्यायालयाने केंद्र सरकारची भूमिका मागवली आहे. 

सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) रजत मोहन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्राची भूमिका मांडण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांना वेळ दिला.४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीसाठी प्रकरण निश्चित करताना, न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्ता या टप्प्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए)अंतर्गत या व्यावसायिकांवर लादलेल्या जबाबदारींशी संबंधित काही तरतुदींच्या वैधतेला आव्हान देत नाही.

खंडपीठाने नमूद केले की, सीए हे अकाउंटन्सीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि देखरेखीसाठी ही व्यवस्था केवळ निर्दिष्ट व्यवहारसंदर्भात केली गेली आहे. याचिकाकर्त्याला नवीन प्रणालीतील समस्या निदर्शनास आणण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव नरुला यांचाही समावेश होता. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल शर्मा यांनी याचिकेवर नोटीस न बजावण्याची विनंती केली, परंतु ती मान्य झाली नाही.

सीएंचे पोलिसीकरण, वकिलाचा युक्तिवाद

याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ वकील त्रिदीप पाइस यांनी युक्तिवाद केला की, हा समावेश अस्पष्ट आणि व्यक्तिनिष्ठ आधारावर व्यावसायिकांचे पाेलिसीकरण करत आहे, जे ग्राहक आणि त्यांच्यातील विश्वासार्ह नातेसंबंधाचे उल्लंघन करते. ग्राहकाविरुद्ध कोणताही फौजदारी खटला नसतानाही सीएंवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे, याकडे पाइस यांनी लक्ष वेधले. “माझ्यावर पीएमएलएअंतर्गत कारवाई होऊ शकते... तुम्ही तुमच्याच क्लायंटची चौकशी करत आहात, असे ते म्हणाले.

टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयchartered accountantसीएEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय