शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कोरोना महामारी जैविक युद्धात बदलू शकते, जनरल बिपीन रावतांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 9:41 PM

CDS Bipin Rawat warns against biological warfare : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. आता तर कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत  ( Bipin Rawat) यांनी मंगळवारी मोठा इशारा दिला आहे. या कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे बिपिन रावत यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, बिम्सटेक (Bimstec) सदस्य देशांचा समावेश असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासाच्या कर्टेन रेजर कार्यक्रमात, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांनी देखील कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आणि संसर्गाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ, यावरून सतर्क केले आहे. यावरून कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, हेच दिसून येते. 

या कार्यक्रमात भारतासह बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, थायलंड, श्रीलंका आदी देश सहभागी होत आहेत. सीडीएस बिपीन रावत यांनी कर्टेन रेजर कार्यक्रम पॅनेक्स-21 मध्ये सांगितले की, मी आणखी एक मुद्दा उपस्थित करू इच्छितो. तो म्हणजे नवीन व्हेरिएंट युद्धाचे स्वरूप घेत आहे. या विषाणूंचा आणि रोगांचा आपल्या देशावर परिणाम होऊ नये म्हणून आपण स्वतःला बळकट करून त्याचा सामना करावा लागेल. आता कोरोनाचे ओमायक्रॉन व्हेरिएंट समोर आले आहे. जर ते इतर स्वरूपात बदलले, तर आपल्याला त्यासाठी तयार राहावे लागेल, असे बिपीन रावत म्हणाले.

आपल्या सर्वांसाठी आपण आपल्या बुद्धिमत्तेने एकमेकांना साथ देणे अत्यंत आवश्यक आहे, असे जनरल बिपीन रावत म्हणाले. तसेच, जनरल बिपीन रावत यांनी याकडेही लक्ष वेधले की, जगातील सशस्त्र दलांना आपत्तींचा सामना करण्यासाठी विशेष तयारी करावी लागेल. कोरोना दरम्यान, असे दिसून आले की प्रत्येक देशाने आपल्या नागरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मदत करण्यासाठी संरक्षण दलांचा वापर केला. दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी सदस्य देशांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींशी लढण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन