शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

‘नेट’ परीक्षेच्या केंद्रावर सीसीटीव्ही, जॅमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 08:42 IST

पहिलाच प्रयोग : युजीसी घेणार देशातील २३५ शहरांमध्ये परीक्षा; साडेनऊ लाख विद्यार्थी

एसके गुप्ता

नवी दिल्ली : युजीसीद्वारे घेण्यात येणारी नेट परीक्षा यंदा सीसीटीव्ही, जॅमर लावलेल्या केंद्रांवर होणार आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार करू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत १० टप्प्यात ही परीक्षा देशातील २३५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रावर मोबाइल किंवा इंटरनेटशी जोडले जाणारे कोणतेही उपकरण कामच करू नयेत, यासाठी जामर बसविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएने पहिल्यांदाच परीक्षेसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी लोकमतला सांगितले की, परीक्षेसाठी ९.५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा पारदर्शक करण्यासाठी आहे, गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक तंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ५९९ केंद्रांवर होणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या वेळीही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. हे देशात एवढ्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच होत आहे. काही केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच कोण्याही प्रकारचे गॅजेट सोबत आणू नका, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ प्रवेश पत्र आणि ओळख पत्र एवढेच सोबत आणावे, असेही सांगण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.ऑनलाइन नव्हे केवळ कॉम्प्युटरवरच्परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचा लोकांनी आतापर्यंत समज करून घेतला आहे. पण ही परीक्षा केवळ कॉम्प्युटरवर होणार आहे. यासाठीची प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअरद्वारे कम्प्युटरवर उपलब्ध करून दिली जाईल.च्विद्यार्थ्यांना पेनचा वापर करण्याऐवजी केवळ उत्तरांवर क्लीक करावे लागेल, असेही विनीत जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Mumbaiमुंबईcctvसीसीटीव्ही