शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:56 IST

CBSE Result : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे.

नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) ने शुक्रवारी 12वी बोर्डाचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in यावर हा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 99.37  टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही, 6149 (0.47) विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. या निकालानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. 

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. तसेच, ज्यांना वाटते की त्यांनी अधिक मेहनत घेतली किंवा यापेक्षाही चांगले गुण मिळवले असते त्यांनाही मोदींनी मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या अनुभवातून शिका आणि नेहमी मोठं ध्येय पाहा. एक उज्ज्वल आणि संधींनी भरलेलं भविष्य तुमची वाट पाहत आहे. तुमच्यातील प्रत्येकजण प्रतिभेचा उर्जास्थान आहे. माझ्या नेहमीच शुभेच्छा... अशा शब्दात मोदींनी कोरोना कालावधीतील निकालाकडे पाहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय.  यंदाच्या वर्षी बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे गेलेल्या बॅचने एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना केला आहे. शैक्षिणक क्षेत्रानेच गेल्या वर्षभरात अनेक बदल पाहिले आहेत. तरीही, सध्याच्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत सर्वोत्तम योगदान दिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन... असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  दरम्यान, यंदाच्या परीक्षेतही परत एकदा मुलींनी बाजी मारलेली दिसत आहे. यंदा मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 0.54% ने जास्त आहे. यंदाच्या परीक्षेत 99.67 मुली तर 99.13 टक्के मुलं पास झाली. सलग सहाव्या वर्षी मुलींना बाजी मारलेली आहे. 

निकालाचा फॉर्म्युलाबोर्डान ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, यंदाचा 12वीचा निकाल 30:30:40 फॉर्म्युलानुसार लावण्यात आला आहे. यात 10वी आणि 11वीतील 5 पैकी 3 सर्वाधिक गुण असलेल्या विषयांना ग्राह्य धरले आहे. तर, 12वीच्या यूनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या आधारे टक्केवारी काढण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा पाहावा ?निकाल पाहण्यासाठी CBSE ची अधिकृत साइट cbseresults.nic.in वर जाऊन 12वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लॉगइन करुन आपला निकाल पाहता येईल. विद्यार्थी यावरुन निकालाची प्रिंटदेखील काढू शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानCBSE Examसीबीएसई परीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा