शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

CBSE प्रमुखांनाही मिळाला होता 'तो' फुटलेला पेपर अन् उत्तरं, तरीही झाली परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 12:00 PM

पेपर लिक करणाऱ्यांनी 10 व्या गणिताच्या आणि 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची हाताने उत्तर लिहिलेली उत्तरपत्रिका आधीच सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली होती. 

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई)चे पेपर फुटल्याने दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र या दोन विषयाच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जाणार आहेत. पेपर फुटल्यानंतर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. पेपर लिक करणाऱ्यांनी 10 व्या गणिताच्या आणि 12वीच्या अर्थशास्त्र विषयाची हाताने उत्तर लिहिलेली उत्तरपत्रिका आधीच सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली होती. 

12 वीच्या अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका सोमवारी संध्याकाळी सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविली. तर 10 वीच्या गणित विषयाची हाताने लिहिलेली उत्तरपत्रिका मंगळवारी सीबीएसईच्या चेअरमॅनकडे पाठविली होती. त्यामुळे आता या पेपरफुटी प्रकरणावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीबीएसईच्या दोन्ही इयत्तांच्या प्रश्नपत्रिका जर आधी सीबीएसईच्या ऑफिसमध्ये पाठविण्यात आल्या होत्या तरीही परीक्षा का घेतली गेली? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. 12 वीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा 27 मार्च आणि 10वीच्या गणित विषयाची परीक्षा 28 मार्चला झाली. 

 

सीबीएसईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, अज्ञात व्यक्तीकडून 26 तारखेला संध्याकाळी सहा वाजता 4 पानांची हाताने लिहिलेली उत्तरपत्रिका मिळाली. ही उत्तरपत्रिका एका लिफाफ्यात सीबीएसई अकॅडमिक यूनिटकडे पाठविण्यात आली होती. तसंच 23 मार्च रोजी एक फॅक्स आला होता. 23 तारखेला संध्याकाळी चार वाजता आलेल्या फॅक्समध्ये पेपर फुटी प्रकरणात एका कोचिंगचे संचालक आणि दोन शाळांचा सहभाग असल्याची माहिती देण्यात आली होती.  सीबीएसईने सांगितलं की, या तक्रारी 24 मार्च रोजी रिजनल ऑफिसमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनाही याबद्दलची माहिती देण्यात आली होती.  

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा