शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द; कोरोना संकटात विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:55 IST

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य महत्त्वाचे : पंतप्रधान

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईची १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल. या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेच्या ताण देणे उचित ठरणार नाही. परंतु १२ वीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष, शिक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते. कोरोनापश्चात आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुण देता येतील यासाठी शिक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या तीन पर्यायांची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.सोमवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत या परीक्षांबाबत सविस्तर आराखडा गुरुवारी सादर करू, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यावेळी कोर्टाने म्हटले होते की, तुम्ही कोणताही पर्याय निवडा परंतु त्यासाठी ठोस आधार द्या. काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण तसेच ओडिशा आदी या राज्यांनी केवळ मुख्य विषयाची परीक्षा घेऊन परीक्षेचा वेळ कमी करण्याचा आग्रह धरला होता. मुलांनी आपापल्या शाळेतच परीक्षा द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. देशातील तीन हजार विद्यार्थ्यांनीही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांना चिठ्ठी लिहून सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करून इतर पर्यायांचा विचार करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती केली होती. कोरोना काळात परीक्षा घेतल्याने जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असे त्यात म्हटले होते. राज्यात बारावीची परीक्षा रद्द होणार?सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. महाराष्ट्र सरकारही राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवादसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून १२ वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या