शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बँक घोटाळ्यांप्रकरणी १५ राज्यांमध्ये छापे, सीबीआयची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 03:32 IST

सीबीआयची कारवाई : १६९ ठिकाणी धडकले अधिकारी

नवी दिल्ली : देशातील विविध बँक घोटाळ्यांच्या तपासाचा भाग म्हणून सीबीआयने मंगळवारी महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये छापे घातले. हे छापे एकाच वेळी १६९ ठिकाणी छापे घालण्यात आले, अशी माहिती सीबीआयतर्फे देण्यात आली. या छाप्यांबाबत सीबीआयने अतिशय गुप्तता पाळली होती.

एकूण ३५ बँक घोटाळ्यांची प्रकरणे सध्या सीबीआयपुढे तपासासाठी आली असून, या एकूण घोटाळ्यांतील रक्कम ७ हजार कोटी रुपये आहे. या सर्व प्रकरणांतच छापे घालण्याचा निर्णय सोमवारी सीबीआयच्या मुख्यालयामध्ये झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना रात्री माहिती देण्यात आली आणि आज सकाळी या सर्व १६९ ठिकाणी सीबीआयचे अधिकारी एकाच वेळी छापे घालण्यासाठी पोहोचले.सीबीआयने या ३५ बँका कोण आहेत, हे घोटाळे नेमके कोणी केले आहेत, त्यात बँक अधिकारी सहभागी आहेत वा उद्योजकांनी ते केले आहेत, याची माहिती दिली नाही. तसेच आज छापे कोणत्या ठिकाणी घालण्यात आले, हेही सांगण्यात आले नाही. मात्र हे सारे घोटाळे राष्ट्रीकृत बँकांतील आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांबरोबरच दादरा व नगरहवेली व चंदीगड येथे या धाडी घालण्यात आल्या.एका वर्षात ६,८00 घोटाळेदेशात २0१८-१९ या वर्षांत झालेल्या बँक घोटाळ्यांची संख्या ६,८00 इतकी असून, त्यातील रक्कम ७१ हजार ५00 कोटी रुपये आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यानंतर केंद्र सरकार आणि सीबीआय यांनी अशा सर्व घोटाळ्यांचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र