शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:42 IST

सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात अशी टिप्पणी केली आहे, जाणून घ्या...

Supreme court:न्यायालयांनी नियमितपणे CBI चौकशीचे आदेश देऊ नयेत. आपले अधिकार अधिक संयम आणि सावधगिरीने वापरावेत. जेव्हा इतर सर्व पर्याय संपले असतील आणि प्रकरणाची निष्पक्षता बाधित झाली असेल, तेव्हाच CBI चौकशीचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचा आदेश देणे केवळ संस्थेवरील कामाचा भार वाढवत नाही, तर राज्यांच्या तपास यंत्रणांवरील विश्वासालाही धक्का देते, अशी महत्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

काय आहे प्रकरण ?

हा निर्णय अलाहाबाद हायकोर्टच्या आदेशावर दिला गेला आहे. हायकोर्टने उत्तर प्रदेश विधान परिषदेत कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी CBI ला निर्देश दिले होते. या आदेशावर आक्षेप घेत न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने हायकोर्टचा तो निर्णय रद्द केला आणि स्पष्ट केले की, CBI चौकशीचा आदेश सहजासहजी देता येत नाही.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, CBI चौकशीचा आदेश सामान्यतः देऊ नये किंवा केवळ यासाठी देऊ नये की, कोणत्या तरी पक्षाने एखाद्या राज्यातील पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. सीबीआय चौकशीचा आदेश देण्याचा अधिकार संयमाने, सावधगिरीने आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीत वापरला पाहिजा. संबंधित न्यायालयाला खात्री पटली पाहिजे की, संबंधित प्रकरणात सीबीआय तपास आवश्यक आहे, किंवा प्रकरण इतके गुंतागुंतीचे, व्यापक किंवा राष्ट्रीय प्रभावाचे आहे की, केंद्रीय एजन्सीची गरज भासते. केवळ अशा परिस्थितीतच सीबीआय चौकशीचे आदेश द्यावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Courts should be restrained; CBI inquiries in every case inappropriate: SC

Web Summary : Supreme Court cautions against routine CBI inquiries. Use power judiciously when other options fail and fairness is compromised. Overuse burdens CBI, undermines state agencies' credibility. Allahabad HC order for CBI probe in UP recruitment quashed; CBI inquiries not easily ordered.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग