शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CBI FIR DTC Bus: केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 21:14 IST

CBI FIR DTC Bus: दिल्ली परिवहन महामंडळाने 1 हजार बस खरेदी केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता.

नवी दिल्ली: दिल्लीतीलआप सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईनंतर आता सीबीआयने रविवारी दिल्ली सरकारच्या 1,000 बस खरेदी आणि देखभालीमध्ये अनियमितता असल्याच्या आरोपांसंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली सरकारने बस खरेदीतील भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सीबीआयचा वापर करून छळ केल्याचा आरोप केला होता.

दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) बस खरेदीच्या वार्षिक देखभाल करारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला होता. या वर्षी मार्चमध्ये दिल्ली विधानसभेत भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. जूनमध्ये माजी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने एएमसीमध्ये प्रक्रियात्मक लूपहोल्स शोधून काढल्या होत्या आणि त्या दुरुस्त करण्याची शिफारस केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एलजीने हे प्रकरण गृह मंत्रालयाकडे विचारासाठी पाठवले आहे.

मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपीदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.  तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकली होती. आता या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने या प्रकरणात एकूण 15 जणांना आरोपी केले आहे. त्यात मनीष सिसोदिया यांचा आरोपी क्रमांक एक असा उल्लेख करण्यात आला आहे.  

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभाग