शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो हेरगिरीप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने दाखल केला एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 02:16 IST

१९९४ मधील प्रकरण : शास्त्रज्ञाला गोवल्याचा आरोप

ठळक मुद्देपाकिस्तानला विकण्यासाठी इस्रोच्या रॉकेट इंजिनचे गोपनीय आरेखन मिळविल्याच्या आरोपावरून मालदीवच्या नागरिक रशिदाला तिरुवनंतपूरमधून अटक केली होती.

नवी दिल्ली : इस्रो हेरगिरी प्रकरणात अंतराळ शास्त्रज्ञ नम्बी नारायण  यांना गोवल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून केरळच्या माजी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल रोजी आदेश दिला होता की, १९९४ मधील इस्रोशी संबंधित हेरगिरी प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचा अहवाल सीबीआयला देण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला यापूर्वीच अधिक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

पाकिस्तानला विकण्यासाठी इस्रोच्या रॉकेट इंजिनचे गोपनीय आरेखन मिळविल्याच्या आरोपावरून मालदीवच्या नागरिक रशिदाला तिरुवनंतपूरमधून अटक केली होती. त्यानंतर केरळ पोलिसांनी ऑक्टोबर १९९४ मध्ये दोन गुन्हे नोंदविले होते. भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्रो) क्रायोजेनिक प्रकल्पाचे तत्कालीन संचालक नम्बी नारायण यांना इस्रोचे तत्कालीन उपसंचालक डी. शशिकुमारन आणि फौजिया हसन (रशिदाची मैत्रीण) यांच्यासमवेत अटक करण्यात आली होती. सीबीआयला चौकशीत आरोप खोटे असल्याचे आढळले होते. सीबीआयने एफआयआरमधील आरोपींची नावे आणि आरोपांबाबत बोलणे टाळले; परंतु, सूत्रांनुसार केरळ पोलिस दलाच्या अनेक माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत. इस्रोच्या माजी शास्त्रज्ञाविरुद्ध पोलीस कारवाई मानसिक छळ असल्याचे स्पष्ट करून  सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये म्हटले होते की, त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा या मूळ मानवी हक्कांवर गदा आणली गेली. पूर्वी प्रशंसनीय कामगिरी करून त्यांना शंकास्पद तिरस्काराला सामोरे जावे लागले. केरळचे माजी पोलीस महासंचालक एस. मॅथ्यूज आणि अन्य दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध नारायण हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. केरळ पोलिसांनी कुभांड रचले. जे तंत्रशास्त्र विकण्यासाठी चोरले, ते त्यावेळी अस्तित्वात नव्हते, असा दावा नारायण यांनी कोर्टात केला होता.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागisroइस्रो