शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 06:39 IST

CBI News: सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली : सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. 

भ्रष्टाचाराच्या ६५८ प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी प्रलंबित असून, त्यातील ४८ प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळ रेंगाळली आहेत. सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९०३ प्रकरणांच्या खटल्यांपैकी १,३७९ खटले हे तीन वर्षांहून कमी काळ, ८७५ खटले तीन वर्षांहून जास्त व पाच वर्षांहून अधिक, २,१८८ खटले पाच वर्षांहून जास्त व दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. २,४६१ खटल्यांचा १० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण निकालच लागलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. 

१,६१० पदे सीबीआय यंत्रणेत रिक्तसीबीआयमधील कर्मचाऱ्यांचे ७,२९५ इतके संख्याबळ असून, त्यातील १,६१० पदे रिक्त आहेत. ३१ डिसेंबर २०२३पर्यंतची ही स्थिती आहे. रिक्त पदांपैकी १,०४० ही एक्झिक्युटिव्ह दर्जाची असून, ८४ हे विधी अधिकारी, ५३ टेक्निकल ऑफिसर, ३८८ मंत्रालयांशी निगडित कर्मचारी, कॅंटीनमध्ये काम करणारे ४५ कर्मचारी आहेत. त्यांची पदे रिक्त आहेत. 

सीबीआयवर कामाचा मोठा बोजा- गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एक वर्षात सीबीआयने त्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, अशी अपेक्षा असते. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित न्यायालयात तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल करायचे असते. - सीबीआयकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, कामाचा मोठा भार, खटला चालवण्यास मंजुरी देण्यात विलंब इत्यादी कारणांमुळे अनेक प्रकरणांचा वेळेत तपास पूर्ण होत नाही. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय