शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 10:16 IST

आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देआयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक दिल्लीतील सीबीआयच्या ज्या कार्यालयाचे उदघाटन चिदंबरम यांनी केले होते, त्याच कार्यालयात त्यांना बुधवारी रात्री आरोपी म्हणून आणण्यात आले

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. एकेकाळी गृहमंत्री म्हणून जी संस्था चिदंबरम यांच्या आदेशान्वये काम करत असे, त्याच संस्थेने त्यांना अटक केली. इतकेच नव्हे तर दिल्लीतील सीबीआयच्या ज्या कार्यालयाचे उदघाटन चिदंबरम यांनी केले होते, त्याच कार्यालयात त्यांना बुधवारी रात्री आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 30 जून 2011 रोजी यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान सीबीआयच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर गृहमंत्री पी. चिदंबरम यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, आता बरोब्बर आठ वर्षांनंतर त्याच सीबीआय कार्यालयात चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच याच कार्यालयातील कोठडीत त्यांना रात्र काढावी लागली. 

 एएनआय या वृत्तसंस्थेने सीबीआय कार्यालाच्या उदघाटन समारंभाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, कपिल सिब्बल वीरप्पा मोईली आदी नेते दिसत आहेत. अजून एक योगायोगाची बाब म्हणजे पी. चिदंबरम हे गृहमंत्री असताना सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने अमित शहा यांना अटक केली होती. आता सुमारे एका दशकानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. तसेच पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमCBIगुन्हा अन्वेषण विभाग