शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयने ‘अगुस्तावेस्टलॅण्ड’मध्ये काहींची नावे गोवण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:21 IST

‘सीबीआयने मला दुबईत काही ठराविक व्यक्तींची नावे गोवण्यास सांगितली होती.

नवी दिल्ली : ‘सीबीआयने मला दुबईत काही ठराविक व्यक्तींची नावे गोवण्यास सांगितली होती. असे न केल्यास तुरुंगवासाला सामोरे जावे लागेल, असे धमकावलेही होते, असा खळबळजनक आरोप आगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर सौद्यातील घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने दिल्ली कोर्टात केला. भारतात प्रत्यार्पित होण्याआधी मला सीबीआयने उपरोक्त धमकी दिली होती, असा आरोप त्याने वकिलामार्फत कोर्टात केला.पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर मिशेलला धोका होण्याची शक्यता आहे, असे तिहार तुरुंग प्रशासनाने कोर्टाला सांगितले. त्यावर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी मिशेल याला अन्य कोठडीत हलविण्याचा आदेश तुरुंग अधीक्षकांना दिला. तो सध्या तिहार तुरुंगातील क्रमांक २ च्या कोठडीत आहे. दुबईहून प्रत्यार्पण झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला २ डिसेंबर रोजी अटक केली होती. सीबीआयच्या विशेष वकील डी.पी. सिंह यांनी मिशेलच्या उपरोक्त आरोपांचा इन्कार केला.>वकील काय म्हणालेसुनावणीदरम्यान मिशेलचे वकील अल्जो के. जोसेफ यांनी सांगितले की, सीबीआयचे अधिकारी मिशेल दुबईत भेटले. या प्रकरणात काही ठराविक व्यक्तींची नावे घेतली नाहीत किंवा अपेक्षित कबुली दिली नाही, तर तुरुंगावासाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी मिशेलला सांगितले. सुरक्षेच्या नावावरून त्याला वेगळे ठेवले जात आहे. त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. तथापि, सीबीआयने हे सर्व आरोप नाकारले. या आरोपांत जराही सत्यता नाही. दरदिवशी तो नवीन आरोप करीत आहे, असे सीबीआयच्या वकिलाने म्हटले आहे.