शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडला; पाचव्या मजल्यावरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:19 IST

जीव वाचवण्यासाठी तरुणाची उडी

नवी दिल्ली: दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्या एका तरुणानं पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. दक्षिण दिल्लीतल्या तिगडी भागात हा प्रकार घडला. या तरुणाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिलं असावं, अशी शंका असल्यानं पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तिगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जे. जे. कॉलनीत एक तरुण दुसऱ्याच्या पत्नीसोबत आढळून आला. महिलेच्या पतीला हा तरुण आक्षेपार्ह स्थितीत सापडला. त्यानंतर त्यानं दोघांना एका खोलीत बंद केलं. याबद्दलचा बभ्रा होऊ नये म्हणून महिलेसोबत असलेल्या तरुणानं पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या महिलेचा पती तुघलकाबादमध्ये कस्टम क्लियरन्स एजंटसोबत काम करतो.  मृत तरुणाचं नाव पंकज (29) असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी दिली. 'पंकज जे. जे. कॉलनीमधल्याच पांडव नगरमध्ये राहतो. तर 32 वर्षांची महिला तिच्या पतीसोबत जे. जे. कॉलनीतल्या एका इमारतीत वास्तव्यास आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेचार-पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याची माहिती पोलिसांना साडेपाचला मिळाली,' असं कुमार यांनी सांगितलं. ही हत्या असल्याचं प्राथमिक तपासातून सिद्ध झालेलं नाही. पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्यानं पंकजचा मृत्यू झाल्याचं तपासातून समोर आलं आहे. मात्र या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचं ते म्हणाले.  

टॅग्स :Suicideआत्महत्या