शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

IRCTC: रेल्वेत खानपान व इतर सेवा बंद, भाडे मात्र जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:26 IST

जनतेची नाराजी : सवलत बंद केल्याने ज्येष्ठ नागरिकही त्रस्त. भारतात काेराेनाचा रुग्ण आढळल्यानंतर २० मार्च २०२० पासून संपूर्ण प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे सध्या मर्यादित प्रवासी रेल्वे सुरू आहेत. मात्र, त्यात मिळणाऱ्या सुविधा आणि वाढीव प्रवास भाड्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. त्यातही प्रवासभाड्यात ज्येष्ठांना काेणतीही सवलत न दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची रेल्वेवर प्रचंड नाराजी आहे. रेल्वेने काही गाड्यांमध्ये खानपान सेवा बंद केली तसेच सुपरफास्ट गाड्यांचे दर आकारण्यात येतात. मात्र, गाडी प्रत्येक स्थानकावर थांबते. या प्रकारामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

भारतात काेराेनाचा रुग्ण आढळल्यानंतर २० मार्च २०२० पासून संपूर्ण प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली हाेती. त्यानंतर मजुरांना घरी परतता यावे म्हणून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. हळूहळू टप्प्याटप्प्याने मर्यादित स्वरुपात प्रवासी रेल्वे गाड्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, या गाड्यांमध्ये काही सुविधा बंद करण्यात आल्या. काेराेनाचे कारण सांगून खानपान सेवा, एसी डब्यांमध्ये ब्लॅंकेट आणि उशी पुरविणे बंद करण्यात आले. पाकीटबंद अन्न पुरविण्यात येते. मात्र, त्याचा दर्जा अतिशय खराब असताे. या गाड्यांसाठी तिकीटदरदेखील जास्त आकारण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासभाड्यातील सर्व सवलती रेल्वेने रद्द केल्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतही बंद झाली. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्येष्ठांना वाढीव प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.

आणखी एक बाब म्हणजे, दाेन ठराविक स्थानकांमध्ये वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळे प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. या गाड्या डायनामिक प्रायसिंग असलेल्या दुरंताे, राजधानी किंवा इतर श्रेणीच्या गाड्यांमध्ये नाहीत. तरीही जास्त भाडे आकारण्यात येत आहे. भाडे सुपरफास्ट गाड्यांचे घेतात. मात्र, गाडी सर्वच ठिकाणी थांबते. अशा प्रकारावरून रेल्वेवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सवलत नाकारल्याने ज्येष्ठांची नाराजीप्रवासभाड्यात यापूर्वीच्या काळात ज्येष्ठ नागरिक महिलांना ५०, तर पुरुषांना ४० टक्के सवलत मिळते. त्यामुळे बाहेरगावी तीर्थयात्रा किंवा नातेवाईकांकडे जाणाऱ्या ज्येष्ठांना फार माेठा आधार मिळत हाेता. मात्र, रेल्वेने ही सवलत बंद केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले आहेत.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसी