शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी वाढविण्यासाठी भारतीयांनी फस्त केले ३ लाख टन काजू; कोरोनानंतर रेकॉर्ड ब्रेक विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:33 IST

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला.

नवी दिल्ली-

कोरोना महामारीच्या काळात लोकांचा रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे कल वाढला. याच कारणामुळे सुकामेवा आणि इतर आरोग्य वर्धक पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. काजूच्या विक्रीतही कोरोना महामारीनंतर तब्बल दीडपट वाढ झाली आहे. 

काजू आणि कोकोआ विकास निर्देशालयानं (DCCD) दिलेल्या माहितीनुसार देशात काजूची वाढती विक्री पाहता उत्पादक देखील निर्यातीपेक्षा घरगुती बाजारावर लक्ष केंद्रीत करत आहेत. देशातील काजूची वार्षिक विक्रीत वाढ होऊन ३ लाख टनपर्यंत पोहोचली आहे. कोरोना महामारीआधी हाच आकडा २ लाख टन इतका होता. एका वर्षाआधी ब्रांडेड काजूची विक्री देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. 

६० टक्के मागणी आयतीनं पूर्ण केली जातेदेशातील वापराच्या तुलनेत काजूचे उत्पादन वाढत नाही. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेतून कच्चे काजू आयात केले जातात. ६० टक्के मागणी केवळ आयातीतून भागवला जातो. २०२१-२२ मध्ये, भारताने ७.५ लाख टन काजूचे उत्पादन केले, तर या काळात कच्च्या काजूची आयात ९.३९ लाख टन होती. मात्र, त्यानुसार त्याचा वापर वाढत असल्याने लवकरच ही आयात दहा लाख टनांचा टप्पा पार करेल. देशातील काजूची प्रक्रिया करण्याची क्षमताही १८ लाख टनांवर पोहोचली आहे, जी एका वर्षापूर्वी १.५ दशलक्ष टन होती. काजूचा सर्वाधिक वापर उद्योगांमध्ये केला जातो, तर वैयक्तिक वापर फक्त १० ते १५ टक्के आहे.

सप्टेंबरपासून काजूचे दर वाढतीलकाजूच्या मागणीच्या अनुषंगाने दरात फारशी वाढ झालेली नाही, परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर त्याचे भाव वाढू लागतील. सध्या 950-1,200 रुपये किलोने विकले जाणारे प्रीमियम काजू 700-850 रुपये दराने विकले जात आहेत. एवढेच नाही तर सर्वसाधारणपणे काजूचा भाव आजही ५५० ते ६५० रुपये किलोपर्यंत आहे. उत्पादनांना आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात काजूच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

निर्यातीत 50 टक्के घटमहामारीनंतर काजूचा देशांतर्गत वापर वाढला पण निर्यात मात्र कमी होत आहे. याचे कारण व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत, भारत दरवर्षी 1,00,000 टन काजू निर्यात करत असे, जे 2021-22 मध्ये 51,908 टनांवर आले आहे. याउलट, व्हिएतनाममध्ये स्थानिक वापर कमी झाला आहे आणि निर्यातीत वाढ होत आहे. व्हिएतनाम आता जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदार देश बनला आहे. तिथून दर महिन्याला जेवढी काजूची निर्यात होते, तेवढी भारत आता वर्षभरात होते.

टॅग्स :saleविक्री