शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:39 IST

या निर्णयाचा फटका रोखीने बेकायदा खाजगी सावकारी करणाऱ्यांना बसेल. 

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रुपये २०,००० पेक्षा जास्त रोखीत दिलेल्या रकमेच्या बदल्यात घेतलेले चेक  ‘कायद्याने अमलात आणता येण्याजोगे कर्ज’ मानले जाणार नाही, असे केरळ हायकोर्टाने म्हटले आहे. या निर्णयाचा फटका रोखीने बेकायदा खाजगी सावकारी करणाऱ्यांना बसेल. 

शाइन वर्गीस यांनी पी.सी. हारी यांना रुपये ९ लाखांची रक्कम रोखीने दिली आणि त्या बदल्यात चेक घेतले; परंतु खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळे चेक वटले नाहीत. वर्गीस यांनी २०१३ मध्ये चेक बाउन्सप्रकरणी कलम १३८, नेगोशिएबल ॲक्टप्रमाणे खटला दाखल केला. मॅजिस्ट्रेट न्यायालयाने हारी यांना दोषी ठरविले. हायकोर्टात हारी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, ही रोखीची व्यवहार पद्धत कलम २६९ एसएस आयकर कायद्याचा भंग आहे.  त्यामुळे हा व्यवहारच बेकायदेशीर असून, याला कायदेशीर कर्ज गृहीत धरता येत नाही. 

हायकोर्टाचे  निरीक्षण

जर कोणी २०,००० रुपयांपेक्षा जास्त रोखीने दिले असतील आणि त्या बदल्यात दिलेला चेक बाउन्स झाला, तर अशा व्यवहारात रोख रक्कम देणाऱ्याची जबाबदारी राहील. हे व्यवहार बेकायदाच ठरतील आणि अशा बेकायदेशीर व्यवहारांसाठी फौजदारी न्यायालयांचे दरवाजे बंद राहतील. जेव्हा भारत सरकार देशातील नागरिकांकडून पूर्णपणे डिजिटल व्यवहार करण्याचे उद्दिष्ट ठेवते, त्यावेळी न्यायालय रोखीच्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि त्यांना कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. - न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन 

 

टॅग्स :KeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालय