शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गायब होताहेत 2 हजारांच्या नोटा? शिवराजसिंह चौहानांना कारस्थानाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 08:38 IST

दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी होत असल्याची शक्यता

नवी दिल्ली: काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. त्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यामुळे निर्माण झालेला रोख रकमेचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 2 हजारांची नोट चलनात आणली. मात्र आता दोन हजारांच्या नोटा चलनात फारशा दिसत नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांची साठेबाजी सुरु झाली का?, की रिझर्व्ह बँकेनं या नोटांची छपाई कमी केली आहे?, अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत. सध्या मध्य प्रदेश, बिहार, गुजरात यांच्यासह अनेक राज्यांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही वृत्तपत्र आणि संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँक शाखांमध्येही दोन हजारांच्या नोटांची आवक घटली आहे. रिझर्व्ह बँकेनं नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या. त्यांचं मूल्य जवळपास 7 लाख कोटी रुपये होतं. जुलैमध्ये बँकांमध्ये असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण 35 टक्के इतकं होतं. नोव्हेंबर 2017 मध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांवर आलं. मध्य प्रदेशसोबतच अनेक राज्यांमधील एटीएममध्ये सध्या चांगलाच खडखडाट आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यामागे कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 'काही लोक 2 हजारांच्या नोटांची साठेबाजी करुन चलनाचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा नोटाबंदी झाली होती, तेव्हा 15 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आता साडे सोळा कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात आहेत. मात्र कोणीतरी दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी करुन बाजारात रोख रकमेची कमतरता निर्माण करु पाहतंय. यामागे कारस्थान आहे,' असं चौहान यांनी किसान महासंमेलनात बोलताना म्हटलं.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान