शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, वादग्रस्त पुस्तकामुळे ख्रिश्चन संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 21:07 IST

Kareena Kapoor : पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

जबलपूर : चित्रपट अभिनेत्री करीना कपूर खानच्या गर्भधारणेशी संबंधित ‘करीना खान प्रेग्नन्सी बायबल’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकरण आता जबलपूर उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावरील प्राथमिक सुनावणीनंतर बुधवारी न्या. डी. के. पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने राज्य सरकारला पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या

याचिकाकर्ते वकील क्रिस्टोफर अँथनी यांनी सादर केले की, करीना खान प्रेग्नन्सी बायबल नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्यामध्ये ख्रिस्ती धर्माच्या पवित्र पुस्तकाचे शीर्षक बायबल आहे. बायबल हा शब्द करीना खान प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाच्या शीर्षकाला जोडला गेला आहे. ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.उच्च न्यायालयात याचिका दाखल

क्रिस्टोफर अँथनी यांनी सांगितले की, या संदर्भात ओमटी पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून करीना आणि प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.करिनाने पुस्तकाला तिचं तिसरं अपत्य सांगितलं

करीना कपूर खानने 9 जुलै 2021 रोजी तिचे पुस्तक लॉन्च केले. फेब्रुवारीमध्ये दुस-या मुलाला जन्म देणाऱ्या करीनाने (४०) या पुस्तकाचे तिसरे अपत्य म्हणून वर्णन केले होते. पुस्तकाच्या प्रमोशनच्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या.असा उल्लेख पुस्तकात आहे

करीना कपूर खानच्या म्हणण्यानुसार, या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान अनुभवलेल्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकावरून बराच वादंग सुरू असून आता उच्च न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Kareena Kapoorकरिना कपूरHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस