शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 20:20 IST

सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसीबीआयने नटराजन यांच्या चेन्नईमधील निवासस्थानी छापे मारले.

नवी दिल्ली, दि. 9 - सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सीबीआयने नटराजन यांच्या चेन्नईमधील निवासस्थानी छापे मारले. नटराजन यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वनखात्याच्या जमिनीवर खाणकामाला परवानगी देऊन  कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात नटराजन यांनी पर्यावरण मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप सीबीआयने केला आहे. 

झारखंडमधील इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीला खाणकामासाठी परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. जयंती नटराजन यांनी पर्यावरण मंत्री म्हणून पदभार संभाळल्यानंतर वनखात्याची 55.79 हेक्टर जमीन अन्य पर्यायी कामांसाठी वापरण्यास ईसीएलला परवानगी दिली. मात्र नटराजन यांच्याआधीच्या मंत्र्याने अशी परवानगी नाकारली होती असे सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

नटराजन यांना त्यानंतर काँग्रेसने पर्यावरण मंत्रीपदावरुन हटवले होते. जयंती नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहून त्यावेळी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेसने त्यावेळी नटराजन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. राहुल यांच्यावर आरोप करण्यासाठी नटराजन यांच्यावर भाजपाशी संबंधित औद्योगिक घराण्यांचा दबाव आहे असे काँग्रेसने त्यावेळी म्हटले होते. 

ईसीएलचे माजी संचालक उमंग केजरीवाल यांचे नावही एफआयआरमध्ये नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. नटराजन यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. नटराजन यांनी जानेवारी 2015 मध्ये काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार