शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अशा स्थितीत दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागणार, जाणून घ्या पहिल्या डोसनंतर दुसरा कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:50 IST

...तर रोगप्रतिकारक शक्ती उशिराने निर्माण हाेणार ! तज्ज्ञ; दुसरा डाेस विलंबाने घेतल्याचा परिणाम

ठळक मुद्देराज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दोन्ही लसींकरिता दुसऱ्या डोसची मुदत ही वेगवेगळी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चार आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत सध्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे. तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण बंद आहे. परिणामी, दुसरा डोस घेण्यापासून वंचित राहिलेले लाभार्थी डोस मिळेल की नाही, या चिंतेत आहेत. दरम्यान, लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर पडणार असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले, मात्र दुसऱ्या डोसला उशीर झाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम हाेणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्याचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दोन्ही लसींकरिता दुसऱ्या डोसची मुदत ही वेगवेगळी आहे. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल तर चार आठवड्यांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे, तर कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असल्यास सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेतला पाहिजे. लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्यास कोणताही दुष्परिणाम नाही, मात्र रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होण्याचा काळ लांबणीवर जातो. राज्य शासनाकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर लसींची उपलब्धता होणे कठीण आहे, त्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. 

लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारकशक्ती शरीरात निर्माण करत असतो. त्यामुळे शरीरात प्रतिपिंड तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे प्रतिपिंड आणि प्रतिकारशक्ती काम करण्याचे प्रमाण वाढवते. पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. राहुल तांबे यांनी दिली.

अशा स्थितीत दोन्ही डोस  पुन्हा घ्यावे लागणारलसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर ५० टक्के प्रतिपिंड शरीरात निर्माण होतात, तर लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचते. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे दुसरे डोस लांबणीवर पडल्यास ते तीन महिन्यांपर्यंत घेण्याची मुदत आहे. या मुदतीत ते न घेतल्यास लाभार्थ्यांना पुन्हा दोन्ही डोस परत द्यावे लागतील. यापूर्वीही पोलिओ, काॅलरा यासारखे आजार आपण लसीद्वारे नियंत्रित केले. परंतु सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित यंत्रणेकडून प्राधान्याने लसीकरण केले जाईल.- रामकृष्ण लोंढे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (राज्य)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई