शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

कर्नाटकी नाट्यात आता शक्तिपरीक्षणाकडे लक्ष, काँग्रेसला बंडखोरांच्या परतीची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:33 IST

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानंतर कर्नाटकी राजकीय नाट्याच्या हालचाली विश्वासदर्शक ठराव केव्हा येणार यावरच शनिवारी केंद्रित झाल्या.

बंगळुरू : आमदार फोडून सरकार पाडण्याच्या भाजपच्या शहाला काटशह देण्यासाठी विधानसभेत स्वत:च शक्तिपरीक्षणाला सामोरे जाण्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानंतर कर्नाटकी राजकीय नाट्याच्या हालचाली विश्वासदर्शक ठराव केव्हा येणार यावरच शनिवारी केंद्रित झाल्या. सत्ताधारी आघाडीने विश्वासदर्शक ठराव केव्हा मांडणार हे गुलदस्त्यात ठेवले असले तरी ठराव सोमवारीच मांडला जावा, असा आग्रह भाजपने धरला आहे.या शक्तिप्रदर्शनाची तयारी म्हणून सत्ताधारी आघाडी व भाजप या दोघांनी आपापल्या आमदारांचे कळप हॉटेल व रिसॉर्टमध्ये एकत्र करून ठेवले. त्याचसोबत काँग्रेसने बंडखोरांचे मन वळवून त्यांना परत आणण्यासाठीही निकराने प्रयत्न सुरू केले. तिकडे राजीनामे देऊन मुंबईत मुक्काम ठोेकलेल्या १५ आमदारांनी शनिवारी शिर्डीला जाऊन साईदर्शन घेतले. विधानसभा अध्यक्षांपुढे हजर होण्यासाठी बंगळुरुला जावे लागले तरी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात न जाण्याचे त्यांनी ठरविले असल्याचे समजते. सभागृहातील मतदानाच्या वेळी हे आमदार बाहेर राहिले तरच कुमारस्वामी सरकार पडू शकते, या भाजपच्या गणितास त्यांचा हा पवित्रा पूरक आहे.

एक दिवस आधी सूचना दिली तरी आपण विश्वासदर्शक ठराव लगेच दुसऱ्या दिवशीच्या विषयपत्रिकेवर घेऊ, असे विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाचा विषय काढला तेव्हा भाजपाचे विरोधीपक्षनेते बी. एस. येदियुरप्पा हजर नव्हते. आता येदियुरप्पा म्हणतात की, सोमवारी समितीची पुन्हा बैठक होईल तेव्हा लगेच त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आपण आग्रह धरू.येदियुरप्पा म्हणाले की, १८ आमदारांनी साथ सोडल्याने आघाडी सरकार स्पष्टपणे अल्पमतात आले आहे. तरीही मुख्यमंत्री राजीनामा न देता विधानसभेत शक्तिपरीक्षण करू इच्छित असतील तर त्यासाठी आमची तयारी आहे. बंडखोर आमदारांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होण्याआधी विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, असे आमचे म्हणणे आहे.
ते म्हणाले की, सोमवारी मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव मांडतात का याची आम्ही वाट पाहू. तसे न झाल्यास मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात काय होते ते पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ.बंडखोर आमदारांचे राजीनामे व अपात्रता यापैकी कशावरही मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सांगितले आहे. त्यामुळे राजीनामे मंजूर होईपर्यंत हे बंडखोर सत्ताधारी आघाडीतील पक्षांचेच सदस्य राहणार असले तरी विश्वासदर्शक ठराव फेटाळण्यासाठी या आमदारांनी मतदानात भान न घेणेही पुरेसे आहे. राजीनामे दिलेले १६ आमदार बाजूला ठेवले तर सत्ताधारी आघाडीकडे जेमतेम १०० आमदार राहतात. हे १६ सोडून सर्व आमदार मतदानाच्या वेळी हजर राहिले तर बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला किमान १०८ आमदारांचा पाठिंबा मिळावा लागेल. दोन अपक्ष धरून भाजपच्या बाडूने १०७ आमदार आहेत.>आणखी ५ आमदारांची सुप्रीम कोर्टात धावआपण दिलेले राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ मंजूर करावेत यासाठी Þडॉ. के. सुधाकर, रोशन बेग, एमटीबी नागराज, मुनीरत्न व आंनंद सिंग या पाच आमदारांनीही सर्वोच्च न्यायालयात शनिवारी याचिका केली. आधी १० बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेसोबत यांच्या याचिकेवरही मंगळवारी सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयात याचिका करणे हा या आमदारांचा राजीनामे मागे न घेण्याच्या ठाम निर्धाराचा संकेत मानला जात आहे..नागराज यांची डबलढोलकी : बंडखोर आमदारांना परत आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी नागराज यांची भेट घेऊन मनधरणी केली. बाहेर येऊन शिवकुमार यांनी नागराज राजीनामा मागे घेण्यास तयार झाल्याचे जाहीर केले. स्वत: नागराज यांनी मात्र सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, माझ्यासोबत ज्यांनी राजीनामा दिला त्या सुधाकर यांच्याशी चर्चा करून मला ठरवावे लागेल..

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी