कोलकाता: एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला बुधवारी रात्री समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या जहाजात अडकलेल्या 22 क्रू मेंबर्सची भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जहाजात असलेल्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच हल्दियामधून भारतीय तटरक्षक दलाने राजकिरण जहान आणि डॉर्निअर विमान बचावासाठी पाठविले. खवळलेला समुद्र आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.
मालवाहू जहाजाला भीषण आग, 22 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 16:32 IST