शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजय दिवस; कारगिल युद्धातील दहा महत्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 09:40 IST

1999 च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले.

मुंबई- कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  1999 च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले. त्यानंतर भारताने ऑपरेशन विजय या कारवाईला सुरुवात केली.

कारगिल युद्धासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:

1) कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 1999 साली झाले होते. 

2) या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.

3) कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते.

4) हे युद्ध प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ 1999 साली मे ते जूलै या महिन्यांमध्ये झाले.

5) दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती.

6) दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. यावेळेस भारताने सफेदसागर या नावाने हवाई कारवाई केली.

7) कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते.

8) ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 14 जुलै रोजी जाहीर केले.

9) 26 जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले.

10) या युद्धात भारताच्या 500 लोकांना हौतात्म्य आले. तर भारतीय सैन्याने 3000 पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवान