शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

दीपक मिस्रांच्या कारकीर्दीत सुप्रीम कोर्टाचा कारभार योग्य दिशेने होत नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:51 IST

तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचा कारभार योग्य दिशेने हाकला जात नव्हता, अशी टीका निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केली आहे.

नवी दिल्ली : तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचा कारभार योग्य दिशेने हाकला जात नव्हता, अशी टीका निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केली आहे. अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे खटले सर्वोच्च न्यायालयातील तुलनेने कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणे, चुकीच्या पद्धतीने खटल्यांच्या कामकाजाचे वाटप करणे, असे अनेक गंभीर आरोप दीपक मिस्रांवर न्या. कुरियन जोसेफ, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर, न्या. जे. चेलामेश्वर यांनी १२ जानेवारी रोजी एका पत्रकार परिषदेत केले होते.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणे ही त्या न्यायालयाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना होती. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा न राखल्यास लोकशाहीचे अस्तित्वही धोक्यात येईल, असा इशाराही या न्यायाधीशांनी दिला होता. कुरियन जोसेफ हे न्यायाधीश पदावरून ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज योग्य दिशेने चालावे याकरिता अनेक गोष्टी आम्ही चार न्यायाधीशांनी वारंवार दीपक मिस्रा यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या; मात्र इतके करूनही सरन्यायाधीश कोणतीच पावले उचलत नसल्याने अखेर ही गोष्ट देशासमोर आणण्यासाठी आम्ही पत्रपरिषद घेतली.>पत्रकार परिषद घेतल्याबद्दल खंत नाहीन्या. कुरियन जोसेफ म्हणाले की, संपूर्ण सुधारणा व्हायला अजून काही कालावधी जावा लागेल. पत्रकार परिषद घेण्याच्या कृतीबद्दल अजिबात खंत वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर न्याययंत्रणेत भ्रष्टाचार आहे हा आरोप मी कदापिही मान्य करणार नाही. कनिष्ठ न्यायालयांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर सरकारने उपाययोजना केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात गैरप्रकार घडल्याचे माझ्या तरी कधीही निदर्शनास आले नाही.