शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात काळजी वाढली, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 62 हजार रुपयांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:41 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची झोप उडेल, अशी बातमी आहे.

मुंबई - जगभरात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशननंतर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची झोप उडेल, अशी बातमी आहे. कारण, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल 62 हजार रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. नुकतेच अर्थ मंत्रालयाने सरकारवर असलेल्या कर्जासंबंधीचा तिमाही अहवाल दिला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सरकारवरील कर्ज वाढून 82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

केंद्र सरकारवर असलेल्या कर्जाची ही रक्कम 82 लाख कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे देशातील 134 कोटी जनतेचा विचार केल्यास प्रत्येक देशातील नागरिकांवर जवळपास 62 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या अहवालानुसार गतवर्षी जूनपर्यंत सरकारवर हे कर्ज 79.8 लाख कोटी रुपये होते. त्यावेळेस प्रत्येक भारतीयावर 59 हजार 552 रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे केवळ तीन महिन्यात तुमच्यावरील कर्जात 2448 रुपयांची वाढ झाली आहे. तर सरकारवर तीन महिन्यात 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. 

कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ हे देशावरील कर्ज वाढण्याचे मूळ कारण आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण आणि अमेरिकी फेड-भारतीय रिझर्व्ह बँकांद्वारे व्याजदरांत झालेली वाढ, हेही या कर्जवाढीचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान, सरकार आणि आपल्यावर असलेलं हे कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे.  अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था रिझर्व्ह फेडने नुकतेच व्याज दरांत वाढ केली आहे. तसेच पुढील काळातही हे व्याजदर वाढले जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक