शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचं स्वप्न महागणार; सरकारच्या नव्या पॉलिसीमुळे कारची किंमत वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:57 IST

लोकसभेत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी कारमध्ये एअरबॅग लावण्याबाबत सरकारला प्रश्न विचारला. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिले.

नवी दिल्ली - देशात वाढणारे रस्ते अपघात पाहता सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये एअरबॅग्स देणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार लवकरच कारमध्ये कमीत कमी ६ एअरबॅग (Airbag) अनिवार्य करणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यापर्यंत अधिसूचना काढली जोईल. ऑटो कंपन्यांना हा नियम लागू असेल. संसदेत सरकारने याबाबत माहिती दिली. 

लोकसभेत भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी कारमध्ये एअरबॅग लावण्याबाबत सरकारला प्रश्न विचारला. त्यावेळी रस्ते वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी कारमध्ये ६ एअरबॅग्स बंधनकारक करण्याचा सरकार विचार करत आहे. लवकरच याबाबत प्रस्ताव आणला जाईल. याची अधिसूचना काढून नियम लागू करण्याचा विचार करत असल्याचं संसदेत म्हटलं. 

६ एअरबॅग्समुळे वाहनांच्या किंमती वाढणारनितीन गडकरींनी कारमध्ये लावण्यात येणाऱ्या एअरबॅगची किंमत सभागृहात सांगितली. जून महिन्यात मारुतीचे चेअरमन आरसी भार्गव म्हणाले की, सरकारच्या नव्या पॉलिसीमुळे ६ एअरबॅग्स असतील तर स्वस्त गाड्यांच्या किंमती वाढतील. छोट्या कारमध्ये ६ एअरबॅग्स लावले तर त्याची किंमत ६० हजारांपर्यंत जाईल. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी कार खरेदी करताना ६० हजार अधिक मोजावे लागतील असा दावा मारूतीने केला. परंतु नितीन गडकरींनी एका एअरबॅगची किंमत जाहीर केली. 

एका एअरबॅगची किंमत...गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये इतकी आहे. मग कंपनी ग्राहकांकडून १५ हजार का घेते? एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे आणि ४ एअरबॅगची किंमत ३२०० रुपये होते. त्यासोबत काही सेंसर आणि सपोर्टिंग एक्सेसरीज इन्स्टॉल केल्या जातात. त्यामुळे एका एअरबॅगचा खर्च ५०० रुपयांनी वाढतो. त्याचा हिशोब पकडला तर एका एअरबॅगसाठी १३०० रुपये खर्च होऊ शकतो मग ६ एअरबॅगचे ७८०० रुपये खर्च होईल. मग कंपनी त्यासाठी ६० हजार अधिक का सांगतेय असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या घडीला भारतात कारमध्ये पुढे बसणाऱ्यांसाठी एअरबॅग बंधनकारक आहे. आता सरकार कारमध्ये मागे बसणाऱ्यांसाठीही एअरबॅग लावणं बंधनकारक करणार आहे. देशात दरवर्षी ५ लाखापर्यंत रस्ते अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो त्यामुळे सरकार ही नवी पॉलिसी आणत आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarutiमारुती