शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असणाऱ्या गुजरातमधील रस्त्यावर उलटली बीअरने भरलेली कार; बाटल्या उचलण्यासाठी लोकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:48 IST

वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला.

ठळक मुद्दे वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. अपघातामुळे गाडीत असलेल्या सगळ्या बीअरच्या बाटल्या रस्त्यावर पसरल्या होत्या.

अहमदाबाद- गुजरातमध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे. असं असताना वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे गाडीत असलेल्या सगळ्या बीअरच्या बाटल्या रस्त्यावर पसरल्या होत्या. त्यामुळे महामार्गापासून जवळच असलेल्या धूमद गावातील लोकांनी रस्त्यावर पडलेले बीअरचे कॅन उचलण्यासाठी मोठी गर्दी केली. रस्त्यावर पडलेल्या बीअरच्या कॅन्सवर लोक असरक्षः तुटून पडले आणि तिथे एक प्रकारे लूट सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

वडोदऱ्याला अहमदाबादने जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेवर एक पांढऱ्या रंगाची मारूती सिलेरियो गाडीची धडक काळ्या रंगाच्या मर्सिडीज बेन्जला बसली. ही घटना धूमद नावाच्या एका छोट्या गावाजवळ घडली. या घटनेनंतर काही वेळातच तिथे लोकांनी गर्दी करत रस्त्यावर पडलेले बीअरचे कॅन्स पळविण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही गाड्या नेमक्या कुणाच्या आहेत ? याबद्दलची माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे अपघातानंतर गाडीवर नंबर प्लेट नव्हत्या. गाड्यांची एकमेकांना धडक बसल्याने नंबर प्लेट पडल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. 

महात्मा गांधींचं गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये स्वातंत्र्यानंतर पूर्णपणे दारूबंदी आहे. गुजरातमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना आणि गुजराती व्यतिरिक्त इतर लोकांसाठी राज्यात एकमद कमी परवाने असलेली मद्याची दुकानं आहेत. तिथे आवश्यक परमिटनंतरच दारू मिळते. याचवर्षी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दारूबंदीचे नियम आणखीन कठोर केले आहेत. नव्या कायद्यानुसार. जर कुणी दारून बनवताना, विकताना किंवा विकत घेताना पकडलं गेलं तर त्या व्यक्तीला 10 वर्षांचा तुरूंगवास किंवा पाच लाख रूपये दंड आकारला जाणार आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरात