शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन अपघातग्रस्तांना मिळू शकतील कॅशलेस उपचार; स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:57 IST

या योजनेनुसार अज्ञात वाहनाच्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि जखमींसाठी ५०,००० रुपये देय आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार मिळण्यासाठी  एक यंत्रणा तयार करण्यावर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. याचवेळी पात्र व्यक्तींच्या खात्यात भरपाईच्या रकमेचे ऑनलाइन हस्तांतरण करण्यावरही निर्णय होईल.

केंद्राने एप्रिल २०२२ पासून हिट अँड रन मोटर अपघात भरपाई योजना, २०२२ लागू केली आहे. या योजनेनुसार अज्ञात वाहनाच्या  अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि जखमींसाठी ५०,००० रुपये देय आहे. मात्र, या योजनेचा  लाभ फारच कमी लोकांनी घेतला. याची दखल घेत, १२ जानेवारी २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने अनेक निर्देश जारी केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिलेत निर्देश?- हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी पीडितांना योजनेची माहिती दिली पाहिजे. - हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींसाठी भरपाईच्या रकमेचा आढावा घ्यावा. - योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.- योजनेची जनजागृती वाढविण्यासाठी पावले उचलावीत

हिट अँड रन मोटर अपघात योजना, २०२२ च्या बळींना भरपाई देण्याबाबत निर्देश जारी करावे लागतील.  जेणेकरून इन्शुरन्स कॉर्पोरेशन नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या खात्यावर भरपाईचे ऑनलाइन हस्तांतरण करू शकेल. रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना कॅशलेस उपचारांबाबतही  विचार होईल.- न्यायाधीश अभय एस. ओक आणि न्या.  ए. जी. मसिह  

हजाराे अपघात, दाव्यांची संख्या फक्त २००- २०२२ मध्ये हिट अँड रन अपघात - ६७,३८७  - २०२२-२३  या आर्थिक वर्षात हिट अँड रन योजनेंतर्गत दावे- फक्त २०५, - निकाली काढलेले दावे ९५- पाच वर्षांत हिट अँड रन : मृत्यू ६६०, जखमी ११३, - नुकसानभरपाई वितरित : एक कोटी ६० लाख  

टॅग्स :Accidentअपघात