शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 09:36 IST

मुंबईच्या दिशेने येताना गुजरातच्या दोन तरुणांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Ahmedabad Car Crash : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि काही लाईक्ससाठी आजची तरुणाई असं करते की ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. रील्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळत असल्याचाही विसर त्यांना पडतो. असाच काहीसा प्रकार गुजरामध्ये घडलाय. रील्सच्या नादात दोन तरुणांना कार अपघातात आपला जीव गमवावा लागला. तर तीन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अगदी तरुण वयातच मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अतिवेगाच्या थरारामुळे गुजरातच्या अहमदाबादमधील दोन तरुणांचा कार अपघातात जीव गेला आणि इतर तिघे जखमी झालेत. हे पाच तरुण, २२ ते २७ वयोगटातील होते. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळ्या धक्कादायक अपघाताचा थरार इन्स्टाग्राम लाईव्ह सुरु असताना झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी गाडीचा वेग तब्बल १६० किमी प्रतितास इतका होता.

गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील महामार्गावर ओव्हरस्पीडिंगमुळे हा अपघात झाला. अहमदाबाद येथील पाच तरुण मारुती सुझुकी ब्रेझा गाडीतून मुंबईला येत होते. गाडी सुरु असतानाच तरुणांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह करत आपल्या प्रवासाची माहिती दिली. कारच्या आत जोरात संगीताचा आवाज येत होता. कारमध्ये बसलेले दोन तरुण इंस्टाग्राम लाईव्हवर हॅलो म्हणाले. यानंतर कारमध्ये बसलेले इतर लोकही कॅमेऱ्यात दाखवले गेले. प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत होता.

त्यानंतर,इन्स्टा लाईव्हमध्ये कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कॅमेरा फोकस केला आणि एका तरुणाने म्हटलं की, पाहा कार कशी चालवत आहे. त्यावेळी कारचा वेग १६० किमी होता. त्यावेळी काही तरुण एकमेकांना शिवीगाळ करताना ऐकायला मिळत होते. दुसरीकडे कार चालवणारा तरुण इतर वाहनांना मागे टाकून भरधाव वेगाने कार चालवत होता. तरुण गाड्यांना ओव्हरटेक करत असताना मागे बसलेले त्याला तसे करण्यास अजून प्रोत्साहित करत होते. यानंतर अचानाक कारचा अपघात झाला. गाडी चालवणारा तरुण अपघात टाळण्यासाठी अचानक  ब्रेक लावतो आणि इंस्टाग्राम लाइव्हमध्ये एक मोठा आवाज येऊन काळोख पसरतो.

दरम्यान, २ मे रोजी ही अपघाताची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात कारचालक अमन मेहबूभाई शेख आणि चिरागकुमार पटेल यांचा मृत्यू झाला. इतर तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरुण अहमदाबादचे रहिवासी होते. अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर गाडीचा अपघात झाला होता. 

टॅग्स :AccidentअपघातGujaratगुजरातMumbaiमुंबई