शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत कॅप्टन विजयकांत यांचा सत्ताधारी आघाडीला दे धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 01:20 IST

असिफ कुरणे -  चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत ...

असिफ कुरणे - 

चेन्नई : तामिळनाडूच्याराजकारणातील कॅप्टन असलेल्या विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने सत्ताधारी अण्णाद्रमुकप्रणीत एनडीए आघाडीमधून बाहेर पडत निवडणुकीआधीच जोराचा धक्का दिला आहे. जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याने डीएमडीकेने हा निर्णय घेतला. तसेच राज्यात अण्णाद्रमुक उमेदवारांच्या पराभवासाठी पक्षाचे कार्यकर्ते काम करतील, असा इशारा डीएमडीकेचे उपसचिव के. एल. सुदीश यांनी दिला आहे. (Captain Vijayakant's push to the ruling front in Tamil Nadu!)तमिळनाडू निवडणुकीत सत्ताधारी अण्णाद्रमुक व विरोधी द्रमुकला आपल्या मित्रपक्षांना जागा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी पक्षांची संख्या दोन आकडी होत असल्यामुळे प्रत्येकाला त्यांंच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य होईना. त्यामुळे आघाड्यांमध्ये निवडणुकीआधीच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ‘एनडीए’मध्ये प्रमुख अण्णाद्रमुकसह भाजप (२०), पीएमके (२३) यांच्यात जागावाटप निश्चित झाले आहे; पण या दोन पक्षांपेक्षा कमी जागा मिळत असल्याने नाराज झालेल्या विजयकांत यांनी ‘एनडीए’तून फारकत घेतली.जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज एएमएमकेचे टीटीटी दिनकरन आणि एमआयएमचे औवेसी यांच्यात हातमिळवणी झाली असून, त्यापाठोपाठ विजयकांत यांनी एनडीएशी काडीमोड घेतल्याने तमिळनाडूत नवी समीकरणे तयार होत आहेत. जागावाटपानंतरही अनेक उलथापालथी होण्याचा अंदाज आहे.

‘एनडीए’तून बाहेर : अण्णाद्रमुक उमेदवारांचा पराभव करण्याचा इशारासन २०११ च्या निवडणुकीत २९ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या डीएमडीकेला आपली जादू कायम ठेवता आली नाही. असे असले तरी या पक्षाकडे अजूनही ८ ते १० टक्के वोटबँक आहे. उत्तर आणि दक्षिण तमिळनाडूमधील ४१ मतदारसंघांत आपले प्राबल्य असल्याचा सुदीश यांचा दावा आहे. 

उत्तर तमिळनाडूमधील जागावाटपावरून सत्ताधारी आघाडीत वाद असून, यातून तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याने डीएमडीकेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमडीके स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणElectionनिवडणूक