शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 08:55 IST

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे उत्तर-पूर्व भागातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतल्या मौजपूरमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC)च्या विरोधात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात सोमवारी हिंसाचार व गोळीबार झाला. गोकुळपुरी येथे दोन गटांतील हिंसाचारात एक पोलीस हेड कॉन्स्टेबल व 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री मनिष सिसोदिया यांनी आपल्या दिल्लीला वाचविण्याचं आवाहन केलंय. 

दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे उत्तर-पूर्व भागातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शाळांमधील परीक्षाही रद्द करण्यात आल्याचे मनिष सिसोदिया यांनी सांगितलंय. तर, दहावीच्या बोर्ड परीक्षेतील उद्याचा पेपरही रद्द करण्यात आला आहे. मनिष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते ट्विट रिट्विट केलंय.  दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांवर अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याच शहरात एवढी भिती यापूर्वी कधीही वाटली नव्हती. मी आज खूप दु:खी आणि हतबल आहे. ही आपली दिल्ली आहे, देशाची राजधानी आहे, हिला वाचवायचंय, असेही सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.  

दरम्यान, या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे. दिल्ली पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. काँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे, असे रेड्डी यांनी म्हटलेआहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी उत्तर पूर्व दिल्लीतील दहा ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. मौजपूर परिसरात सीएए समर्थक व विरोधक दोघांमध्ये दगडफेक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व लाठीमाराचाही वापर करावा लागला. दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपSchoolशाळा