शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:19 IST

CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे.

बंगळुरू : जगभरात कोरोनामुळे उद्योग, व्यवहार ठप्प झाले आहेत. अशातच करोडोमध्ये लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असताना एका फ्रान्सच्या केपजेमिनी या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे या कंपनीच्या एकूण २ लाख कर्मचाऱ्यांपैकी १.२ लाख कर्मचारी एकट्या भारतात आहेत. मंदीच्या सावटाखाली या कंपनीने मोठे धाडसी पाऊल उचलेले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. तर उर्वरीत कर्मचाऱ्यांना जुलैपासून पगारवाढ मिळणार आहे. तसेच जे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकले आहेत त्यांना १०००० रुपयांपर्यंतचा कॅश अलाऊन्स देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रोजेक्टसाठी वेळेचे बंधनाची आडकाठी करण्यात येणार नसून त्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर आणि न कपात करता करण्यात येणार आहेत. मार्च महिन्याच्या मध्यावधीमध्ये कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. 

केपजेमिनी इंडियाचे कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी सांगितले की, हा काळ वाईट आहे. या काळात प्रोजेक्टची वेळ पाळणे महत्वाचे नाही, तर आमचा व्यवसाय कसा विकसित होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आमचे आर्थिक मॉडेल स्पष्ट आहे, यामध्ये बदल करण्याचे काही कारण दिसत नाही. कंपनीचे ९५ टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. एप्रिलमध्ये बढती प्रस्तावित असलेल्यांना १ जुलैपासून पदभार मिळेल. याची जूनमध्ये घोषणा होईल. त्या कर्मचाऱ्यांना मार्चपासून फरकाची रक्कम देण्यात येत आहे. 

कंपनीच्या ८४ हजार कर्मचारी जे ए आणि बी ग्रेडमध्ये आहेत त्यांना त्यांची पगारवाढ नियोजनानुसार मिळणार आहे. पगार कपातीबाबत केपजेमिनी इंडियामध्ये चर्चा झालेली नाही, असे त्यांनी पगार कपातीच्या प्रश्नावर सांगितले.  कर्मचाऱ्यांचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे असेही यार्डी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञानFranceफ्रान्स