शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या गुन्हेगारीची माहिती फलक लावून द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:23 IST

मतदार संघटनेचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

नवी दिल्ली: सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादनांच्या पाकिटांवर जसे तंबाखूपासून आरोग्यास असलेल्या गंभीर धोक्याचा चित्रमय इशारा छापला जातो तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूूमीची माहिती प्रचाराच्या पत्रकांवर तसेच फलकांवरही देणे बंधनकारक करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास पर्णपणे मज्जाव करण्यासाठीच्या जनहित याचिकेवर सध्या सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. अजय खानविलकर, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदू मल्होत्रा यांच्या घटनापीठापुढे सुरु आहे. त्यात भारतीय मतदाता संघटनतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी ही सूचना केली.तंबाखूमधील निकोटिनप्रमाणेच राजकारणातील गुन्हेगारीही लोकशाहीला घातक आहे, असे सांगून ते म्हणाले की, निवडणुकीतील उमेदवांरांची सर्व माहिती मिळणे हा मतदारांचा मुलभूत हक्क असल्याचा निकाल याआधीच झाला आहे. यात गुन्हेगारी पार्वभूमीची माहितीही अंतर्भूत आहे. अशी माहिती उमेदवारांना त्यांच्या उमेदवारी अर्जांसोबातच्या प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते.अ‍ॅड. शंकर नारायणन यांचे म्हणणे असे होते की, प्रतिज्ञापत्रातील ही माहिती जाणून घेण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाच्या वेबसाइटव शोधाशोध करावी लागते. किंवा निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाबाहेरील नोटीसबोर्डावर जाऊन ती पाहावी लागते. त्यासोबच ही माहिती उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराच्या फलकांवर आणि पत्रकांवरच छापली तर ती अधिक सुगमतेने मतदारांपर्यंत पोहोेचेल. मुद्दाम शोधाशोध न करता अशी माहिती जाहीरपणे उपलब्ध होईल. एरवी उमेदवार त्यांच्या प्रचारासाठीच फलक लावत असतात व पत्रके वाटत असतात. त्यामुळे त्यातच ही माहितीही द्यायला सांगण्यात काही गैर नाही. निवडणूक आयोग त्यांच्या नियमांत सुधारणा करून उमेदवारांना असे बंधन घालू शकेल, असेही त्यांचे म्हणणे होते. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवार २८ आॅगस्ट रोजी होईल. त्यावेळी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ केंद्र सरकारची भूमिका मांडतील.न्यायमूर्तींची मार्मिक कोटीही सूचना ऐकून न्या. नरिमन यांनी मार्मिक कोटी केली की, अमुक उमेदवाराला मत देणे देशाच्या आरोग्यास घातक आहे, असा इशारा देण्यासारखेच हे आहे. एकप्रकारे लोकांना लोकशाहीच्या धोक्याप्रति सावधानतेचा इशारा यातून मिळेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक